
समुद्रपूर : लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेल्याने शासनाने नियमित धान्य मोफत देण्याचा आदेश दिला होता तरीही वायगाव (गोंड) येथ स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना धान्य विकत दिले. यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला.
तालुक्यात वायगाव (गोंड) येथे वस्तला पांगूळ यांच्या नावे स्वस्त धान्य दुकान आहे. लॉकडाऊन काळात गहू व तांदूळ हे नियमित धान्य मोफत देण्याचा आदेश शासनाने दिला होता तरीही. येथील दुकानदाराने लाभार्थ्यांकडून पैसे घेतले, अशी तक्रार शत्रुघ्न ऊईके यांनी तहसील कार्यालयात केली होती. या तक्रारीची दखल घेत तपासणी करून स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला.
आता त्या दुकानातील शिधापत्रिकाधारकांना दौलतपूरच्या स्वस्त धान्य दुकानाशी जोडले आहे, असे तालुका पुरवठा निरीक्षक विकास देसाई यांनी सांगितले.