

वर्धा : प्रलंबित मागण्यांसाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मंगळवारपासून (ता. २४) सुरू झाला. संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज तीन दिवसापासून ठप्प झाले आहे. कर्मचारीच नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. असून त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. तीन दिवसापासून काम ठप्प झाल्याने अनेक प्रकरने प्रलंबीत आहे.
शासनमान्य आकृतिबंधानुसार अंमलबजावणी करून तातडीने पदोन्नत्या द्याव्यात, महसूल विभागानुसार बदली धोरण रद्द करावे, अतिरिक्त पदाचे समायोजन रद्द करावे आदी मागण्यांसाठी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. मोटार वाहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. दररोज वर्दळ असणाऱ्या आरटीओ कार्यालयात मात्र संपामुळे गेल्या तीन दिवसापासून शुकशुकाट पसरला आहे. या संपामध्ये रामेश्वर इंगोले, श्री शिरसाट, नितीन आंबीलकर, घनशाम घोडके, श्री संघारे, संदीप घोडे, शेखर रामटेके, सचीन घनमोडे, श्रीमती सावरकर, तेजस सगदेव, विजया नगरकर, जयंत देशमुख यांनी काम बंद ठेवत सहभाग घेतला होता.