

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या 21 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कॅडेट्सनी 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान आयोजित संयुक्त प्रशिक्षण शिबिरात विविध पदके जिंकून यशस्वी भरारी घेतली. 21 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., वर्धा आणि वैद्यकीय कंपनी एन.सी.सी. नागपूर तर्फे मानकापूर स्टेडियम कोराडी रोड, नागपूर येथे सत्र 2024-25 साठी एकत्रित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विदर्भ स्तरावरील एकूण 359 कॅडेट सहभागी झाले.
हिंदी विद्यापीठाच्या 09 कॅडेट्समध्ये, गुड्डू कुमार, हर्ष गुप्ता, मनीष, करण, भरत, गुलाबदान, रणवीर, कृष्णा आणि निशांत यांनी सहभाग घेतला आणि 10 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. शिबिरादरम्यान कॅडेट्सने दररोज पीटी, परेड, नकाशा अभ्यास आणि खेळांचा सराव केला. या कॅम्पमध्ये गोळीबार स्पर्धेत कॅडेट गुड्डू कुमारने सुवर्णपदक प्राप्त केले. कर्नल विजय आणि कॅम्प कमांडंट मेजर यदियाद राजू एन. यांनी त्याला सन्मानित केले. कॅडेट्सचे कौतुकास्पद कार्य लक्षात घेऊन कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व कमांडिंग ऑफिसर, 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा यांचे आभार मानले. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी संवाद कक्षात आयोजित सत्कार कार्यक्रमात कुलसचिव आनन्द पाटील, सहायक कुलसचिव डॉ. विनोद वैद्य, एसोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टिनेंट डॉ. अनिकेत अनिल आंबेकर, सहायक प्रोफेसर डॉ. समरजीत यादव, सहायक प्रोफेसर प्रीति खोडे, सुरक्षा अधिकारी सुधीर खरकटे व जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे उपस्थित होते.