महिला वकिलावर चाकूहल्ला! जिल्हा न्यायालयातील घटना; आरोपींना अटक

वर्धा : न्यायालयाचे कामकाज सुरू असतानाच वृद्ध आरोपीने महिला वकिलावर चाकूने हल्ला केला. ही घटना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोरे मंगळवारी दुपारच्या समारास घडली. या घटनेने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या महिला वकिलाला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भीम गोविंद पाटील ( वय 80) याचा खटला पुलगाव येथील न्यायालयात दोन वर्षांपूर्वी सुरू होता. महिला वकील योगिता मून (वय 40) या आरोपीविरुद्ध खटला चालवत होत्या. यापूर्वीही महिला वकिलावर हल्ला केल्याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून, त्याची शेवटची सुनावणी 22 मार्च रोजी दुपारी एक वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांच्यासमोर झाली.

न्यायाधीशांच्या कक्षात योगिता मून या साक्षीदारांचे जबाब घेत होत्या, त्यादरम्यान अचानक आरोपी भीम पाटील याने अँड. योगिता मून यांच्यावर हल्ला केला. ही घटना उघडकीस येताच उपस्थित पोलिसांनी भीम पाटील याला तत्काळ ताब्यात घेतले. तर जखमी वकिलाला कर्मचारी गणेश खेबले यांच्या मदतीने सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी भीमला अटक केली. आरोपी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे न्यायालयात तगडा पोलिस बंदोबस्त असतानाही आरोपी भीम पाटील चाकू घेऊन न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये कसा पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here