उद्या वर्धा सराफ सुवर्णकारांचा संप! एचयुआयडीला विरोध; दुकाणे पुर्णपने बंद

वर्धा : दागिन्यावरील ‘हॉलमार्किंग युनिक आयडी’ला (एचयुआयडी) विरोध करीत एचयुआयडीच्या स्वरूपात बदल करून तिला व्यवहार्य बनवल्या जावे या मागणीसाठी सराफ-सुवर्णकार सोमवार (ता. २३) आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. या संपात वर्ध्यातील सराफांचा सहभाग असल्याने ग्राहकांची गैरसोय होईल त्यासाठी सराफ-सुवर्णकारांनी दिरगिरी व्यक्त केली आहे.

भारतामध्ये दागिण्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर सराफ- सुवर्णकारांनी त्याचे स्वागतच केले. ग्राहकांच्या हितासाठी असलेला हा कायदा सर्व स्तरावर स्विकारल्या गेला. पण गेल्या काही दिवसांआधी या कायद्याच्या स्वरूपात बदल करून एचयुआयडी संकल्पना लागू करण्यात आली. यातील नियमांचे निर्देश अंमलात आणण्यास सराफ-सुवर्णकारांना अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर संपाची घोषणा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here