मालवाहूच्या धडकेत एक ठार! सहा जखमी

आकोली : तरुण चालकाने त्याच्या ताब्यातील मालवाहू वाहन निष्काळजीपणे चालवून एकास चिरडले तर तब्बल सहा व्यक्तींना जखमी केले. ही घटना नजीकच्या माळेगाव (ठेका) येथे घडली.

अमीत अशोक उईके असे मृतकाचे तर दिवाकर सपकाळ, समय प्रमोद पेटकर, सुरज बबाराव चावरे, राजेश कलोकर, निखील काळे, पंकज दिघडे अशी जखमीची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, माळेगाव (ठेका) येथील रोशन भास्कर पेठे याने त्याच्या ताब्यातील मालवाहू वाहन सुसाट पळवून त्याच्या वाहनासमोर येणाऱ्यांना धडक देत पळ काढण्याचा सपाटा लावला. यात अमित उईके हे वाहनाच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे आरोपी रोशन पेठे व त्याचा साथीदार आकाश पेठे हे दोघे अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करतात. गावातील काहींनी त्यांना हटकले असता वाद झाला. अशातच मद्यधुंद अवस्थेत रोशन वाहनासह पळ काढीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here