साळ्याची हत्या करणाऱ्या जावयास जन्मठेप! प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी दिला निर्वाळ

वर्धा : एका साळ्याची हत्या करून दुसऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात आरोपी जावयी राजेश ऊर्फ राजू एडा शकील भगत (५२, रा. वरुड) याला दोषी ठरवून आजीवन सश्रम कारावास, तसेच ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी हा आदेश २ रोजी दिला.

प्राप्त माहितीनुसार, रुमानंद कांबळे यांचे मृतक देवानंद कांबळे व जखमी नरेंद्र कांबळे हे भाऊ असून जखमी माला भगत ही बहीण आहे. आरोपी राजू ऊर्फे एडा शकील भागत हा रुमानंदच्या बहिणीचा पती आहे. माला भगत हिचे आरोपी पती राजू भगत याच्याशी पटत नसल्याने ती माहेरी तिचा मोठा भाऊ नरेंद्रकडे राहत होती. १६ एप्रिल २०१६ रोजी आरोपी एडा याने रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास नरेंद्र भ्रगत व त्याची पत्नी राहत असलेल्या घरी जात मालाच्या मुलीला घेऊन जात होता. तेव्हा रुमानंद याने आरोपीला अडवले तेवढ्यात तेथे मनीषा कांबळे आल्याने आरोपी व मनीषात शाब्दिक वाद झाला. दरम्यान, तेथे मृतक देवानंद आला असता, आरोपीने त्याला व त्याचे इतर भावांना शिवीगाळ केली. त्यानंतर रुमानंदचा मोठा भाऊ नरेंद्र याने त्याच्या भाचीला आरोपीच्या तावडीतून सोडविले असता आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, आरोपी राजू भगत याने जवळील चाकूने नरेंद्र कांबळे याच्या पोटावर आणि देवानंद कांबळे याच्या छातीवर वार करीत गंभीर जखमी केले होते.

आरोपीची पत्नी माला ही वाद सोडविण्यासाठी धावली असता तिच्यावरही चाकूने वार करीत जखमी केले, रुमानंदने नरेंद्र कांबळे, देवानंद कांबळे व माला भगत यांना ऑटोत बसवत सावंगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी देवानंदला मृत घोषित केले होते. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक आर. एस. शिरतोडे यांनी केला असता, आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता गिरीष व्ही. तकवाले यांनी काम सांभाळले. त्यांना पैरवी सेवानिवृत्त सहायक फौजदार नरेंद्र भगत, सुजित पांडव, देवेंद्र कडू यांनी सहकार्य करीत साक्षीदारांना हजर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here