आरोपीस अटक! कारसह ७.८६ लाखांचा मद्यसाठा जप्त

वर्धा : दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक करून कारसह सात लाख ८६ हजार ६५० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने व तळेगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. सतनामसिंह लहरीसिंह आंधेलेदावरे (रा. वर्धमनेरी) असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमनेरी गावातून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तळेगाव पोलिसांसह संयुक्तरीत्या नाकाबंदी केली असता (एमएच ४० ए ७४८९) क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. कारचालक सतनामसिंह याला अटक करूनकारसह मद्यसाठा जप्त करीत तळेगाव पोलिसात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे यांच्या निर्देशात रोशन निंबोळकर, सागर भोसले, अभिजित गावंडे, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के यांच्यासह तळेगाव पोलिसांकडून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here