वाहनाच्या धडकेत व्यक्‍ती ठार! अज्ञात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल

समुद्रपूर : अज्ञात ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात जाम परिसरात झाला होता. या प्रकरणी १४ रोजी समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्यानेंद्रकुमार छोटेलाल शर्मा हा एमएच ३१ – बीजी ५९४१ क्रमांकाच्या दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात असताना जाम जावाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने जबर धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या ग्यानेंद्रकुमार याला नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातस्थळ समुद्रपूर हद्दीत येत असल्याने अजनी पोलिसांनी प्रकरण समुद्रपूर पोलिसात वर्ग केले. पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.वाहनाच्या धडकेत व्यक्‍ती ठार! अज्ञात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here