नालवाडी उपकेंद्रात मेडिसीन किट वाटप! वर्धा सोशल फोरमचा उपक्रम

वर्धा : वर्धा सोशल फोरमच्या वतीने नालवाडी येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला कोविड-१९ पाॅझीटीव रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या २०० मेडिसिन किट या निःशुल्क देण्यात आल्या. वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डाॅ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.

डाॅ. शैलेजा काळे व आरोग्य टिम यांच्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी डाॅ. मेघे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन सुचना दिल्या. आशा ताईंच्या कार्याचे कौतुक देखील केले. यावेळी सरपंच, प्रतिभा माउसकर, जिल्हा परिषद सदस्या, नुतन राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. दिघेकर मॅडम, वैद्यकीय अधिकारी, डाॅ. काळे मॅडम, डॉ. रशमी कपाळे मॅडम, संजय डफळे, प्रगतिशील शेतकरी बाळा माउसकर, ढोले, फुलझेले (आशा ताई) तसेच वर्धा सोशल फोरमचे सदस्य मोहित सहारे, चेतन काळे, प्रतीक पवार, हर्षल लोहकरे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here