साखळी उपोषणाचा २५ वा दिवस! वर्धा येथे जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने भीम टायगर सेना वर्धा जिल्हा तर्फे साखळी उपोषण

वर्धा : आज ०९ आक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन,वर्धा येथे महाराष्ट्र सरकार, पालकमंत्री सुनिल केदार व आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन तथा पोलीस वेल्फेअरचे विरोधात भीम टायगरचे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ दिवे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ ढोणे, जिल्हा संघटक आशिषभाऊ जांभुलकर, शहर अध्यक्ष, विशाल रामटेके, तालुका अध्यक्ष विशाल नगराळे, आर्वी तालुका अध्यक्ष विनोद पायलेरवी चाटे, पावन धावणे, गणेश खेलकार धम्मा शेलकर, अंकुश गजभिये, अजय अवथरे, अक्षय भगत, अनिकेत भगत, धीरज भगत, अहिंसक तेलंग, संजय कांबळे आदी पदाधिकारी भीमसैनिकांनी साखळी उपोषण केले.

पोलिसांनी अहिंसक तेलंग, गणेश खेडकर, संजय कांबळे, विनोद पायले, धम्मा शेलकर कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करुन अटक केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन भारतीय संविधान जिंदाबाद, पेट्रोल पंप हटलाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या तसेच सरकार, शासन, प्रशासन, पालकमंत्री सुनिल केदार व आमदार रणजित कांबळे यांचा निषेध-मुर्दाबाद करण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौध्द महासभा, भीम टायगर सेना, निर्माण सोशल फोरम, संबुद्ध महिला संघटना, समता सैनिक दल, संभाजी ब्रिगेड, बिरसा क्रांती दल, बहुजन युथ पँथर आदी आंबेडकरी व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या १४ ऑक्टोबर २०२१ रोजी, जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने, वर्धा सिव्हील लाईन येथे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ धमचक्र प्रवर्तन दिनी अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील आंबेडकरी व समस्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here