पवनार गांवचा समाजकार्य विद्याथ्यानी घेतला निरोप

वर्धा : इंद्रप्रस्थं न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा येथील क्षेत्रअभ्यास करणाऱ्या विद्याथ्यानी सामाजकार्य विभाग प्रमुख डॉ. प्रा. प्रभाकर पुसदकर सर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक बुद्ध विहार येथे निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या समारंभाला अध्यक्षा म्हणून ग्रा.प. सदस्या सौ.जयश्रीताई आदमणे, प्रमुख पाहुणे सौ. शशिकलाताई जिंदे व विद्याथी प्रतिनिधी रोहन घुमे मंचावर उपस्थित होते.

विद्याथ्यानी आपापले मनोगत व अनुभव पवनार गावात मिळालेला उत्तम प्रतिसाद आपापल्या शब्दांत व्यक्त केले. ज्यात ग्राम पंचायत कडून मिळालेली मदत व सरपंच सौ. शालीनी ताई आदमणे, उपसरपंच राहुलदादा पाटणकर, ग्रा.प.चे सदस्यगन यांचे मार्गदर्शन गावातील नागरिकाचा प्रतिसाद बचत गट महिलांनी केलेली मदत, आरोग्य उपकेंद्र पवनार येथील अधिकारी या सर्वांच्या मदतीने क्षेत्रअभ्यास करण्यास कुठला त्रास झाला नाही त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. रोहन घुमे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “सहवास सुटला म्हणून, सोबत सुटत नाही! नुसता निरोप दिल्याने, नाते तुटत नाही. आपली एक आठवण म्हणून समाजकार्य विद्याथ्यानी बुद्ध विहार ला घड्याळ भेट दिले व कार्यक्रम सपन्न झाला. उपस्थित विद्याथी प्रितेश खडसे, अनिकेत पराते, ऋत्विक कोल्हे, राजकुमार करेवार, सचिन शेजव, रुपेश नदाणे, रवींद्र जाधव, सचीन चव्हाण, ऋतुजा अतकर, राखी कुळसंगे, प्रतिभा भोंगडे, प्रगती म्हल्ले, प्रांजली नखाले, गावकरी मिलिंदजी जिंदे, उज्वल धोपाटे व अन्य गावातील व्यक्ती उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here