विनोबांची कर्मभूमी पवनार येथे कलापथकाव्दारे शासकीय योजनांचा जागर! नागरिकांचा मिळत आहे चांगला प्रतिसाद; योजनांचा लाभ घेण्याचे गावकऱ्यांना आवाहन

वर्धा : शासनाच्यावतीने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. विद्यमान शासनास दोन वर्ष पुर्ण झाल्याच्यानिमित्ताने ग्रामीण भागात या योजनांची कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पवनार येथे आयोजित या कार्यक्रमास गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील आठही तालुक्यात तीन कलापथक संचांच्यावतीने एकुण 63 गावांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहे. कार्यक्रमामध्ये कोविड, स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी योजना, जीवनदायी आरोग्य विमा, कृषि विभाग योजना, शिवभोजन, स्वाधार योजना, शिष्यवृत्ती योजना आदी योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

वर्धा तालुक्यातील पवनार येथील बाजार चौकात गितासार या कलापथक संस्थेव्दारे करण्यात आलेल्या विविध योजनेच्या जनजागृती कार्यक्रमाला गावक-यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या कलेला मोठी दाद दिली. कलावंतांची गावक-यांना त्यांच्याच बोलिभाषेत मनोरंजनातून प्रबोधन करत गावकऱ्यांना योजना समजावून सांगितल्या.

सोबतच शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे देखील आवाहन केले. यावेळी गितासार कलापथकातील कुसुम मधापुरे, प्रतिक सुर्यवंशी, भूषण भोयर, मंथन नाखले, हर्ष महाजन, हर्ष तेलंग, आयुष मधापुरे, मयुर पटाईत, तन्वी ठोंबरे, जान्हवी ठोंबरे, वृषाली बकाल, सारंग भुयार, साक्षी हिवरे, तनुश्री हिवरे या कलाकारांनी आपल्या कलेव्दारे योजनेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here