पॅरासिटॅमलचा ओव्हरडोस! युवकाचा मृत्यू; वर्धा शहरातील घटना

वर्धा : पॅरासिटॅमल गोळीचा ओव्हरडोस झाल्याने युवकाचा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतल्याची माहिती दिली. रजत राजपाल मेंढे (वय २७, रा. देवळी ह.मु. शिवाजी चौक, वर्धा) असे मृत युवकाचे नाव आहे. रजत मेंढे याची प्रकृती बिघडल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ 30 जानेवारीला दाखल केले होते. रजतचा ९ मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला. रजतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्याचा अहवाल प्राप्त झाला अहवालात पॅरासिटॅमल ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here