भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर! खरांगणा पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू

खरांगणा : भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार (ता. २६) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बस स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर घडली.

दुचाकूचालक लोधेश्वर सुखदेव सपकाळ हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३२ एम ७७४९ ने वर्धेवरून खरांगणा येथे दूध विक्री करून येत असताना अज्ञात कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. धडक देऊन कंटेनर घटनास्थळावरुन पसार झाला या घटनेत योगेश्वर हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी लोकेश्वरला सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. घटनास्थळी पंचनामा करुन अज्ञात कंटेनरचा खरांगणा पोलीस शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here