महिलेच्या आत्महत्येप्रकरणी वसुली एजंटविरुद्ध गुन्हा! 50 हजार भरण्यासाठी तगादा

वर्धा : महिलेच्या आत्महत्येप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीचा एजंट अक्षय भागवत रा. आदिवासी कॉलनी, वर्धा याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक छाया राजेंद्र श्रीवास या महिलेने ज्योत्स्ता प्रकाश देशमुख हिच्याकडून 2018 मध्ये 50 हजार रुपये उसने घेतले होते. ज्योत्स्ना देशमुख हिने 2018 मध्ये बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते मृतक छाया श्रीवास ही उधारी परतफेड म्हणून ज्योत्स्ना देशमुख हिने घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरत होती.

जानेवारी 2022 मध्ये कर्जाच्या हप्त्याची रक्‍कम छाया श्रीवास ही भरू न शकल्याने बजाज फायनान्स लिमिटेडचा वसुळी एजंट आरोपी अक्षय भागवत हा कर्ज हप्त्याची रक्‍कम भरण्याकरिता म्रृतक हिच्याकडे वारंवार तगादा लावत धमक्या देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने 26 जानेवारी 2022 रोजी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारार्थ कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, 29 जानेवारी रोजी सदर महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. या प्रकरणी पल्लवी अतुल अम्रतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बजाज फायनान्स कंपनीचा वसुली एजंट अक्षय भागवत याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाचा अधिक तपास वर्धा शहर ठाण्याचे सहायक फौजदार प्रदिप फडणवीस हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here