एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक! उपजिल्हा रुग्णालयाजवळील घटना

हिंगणघाट : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुसर्‍या ट्रकला जबर धडक दिली. त्यातील एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 उपजिल्हा रुग्णालयाजवळ रात्री शनिवारी 11 वाजताच्या दरम्यान घडला.

आयसर ट्क क्र. एमएच. 34 बीजी 8266 हा हिंगणघाटवरुन वरोरा येथे साबुदाणा माल घेऊन चाललेला होता. त्याच दरम्यान नागपूरवरून हैदराबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी 04 एमजी 6720 या वाहनाने हिंगणघाटनरुन जाणा-या आयसर ट्रकला जबर धडक टिली. यात आयसर ट्रक पलटी झाला. या अपघातात नागपूर मार्गे हैदरबादकडे जाणाऱ्या ट्रकमधील ड्रायव्हर भानुप्रसाद राम भगत रॅकवार जबलपुर(मध्यप्रदेश ) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती गंभीर आहे. हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 44 वरती अपघाताची मालिका गेल्या आठवड्यापासून सुरु असून अनेक अपघातात आपला जिव गमवावा लागला आहे हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची माहिती घेतली आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here