विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त बसपाचे अभिवादन

वर्धा : बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यालय वर्धा येथे महामानव, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दीपस्तंभ असून त्यांच्या प्रज्ञेमुळे व संविधान निर्मिल्याने आपला देश अखंड आहे, रिझर्व्ह बँक, शेती, धरणे, महिलांचे हक्क, अधिकार, मतदानाचा अधिकार, ओबीसिंच्या आरक्षणाची तरतूद अश्या अनेक पैलूवर शेवटच्या श्वासपर्यंत त्यांनी कार्य केले असे विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हा महासचिव अनॉमदर्शी भैसारे, ओमप्रकाश भालेराव, सुधाकर जुनघरे, सिद्धार्थ नगराळे, ॲड.अभिषेक रामटेके, दिनेश वाणी, अरविंद पाटील, पुरुषोत्तम लोहकरे, अभिनव नगराळे, जगदीश पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here