

कारंजा (घाडगे) : क्षुल्लक वादातून व्यक्तीस उभारीने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. बोदरठाणा गावात ही घटना घडली.
सुधाकर मधुकर शेंदरे हा गावातील काही नागरिकांसोबत बोलत असताना प्रमोद किसना खवसी हा तेथे आला. त्याने तू येथे कसा काय आला, असे म्हणून शिवीगाळ केली. सुधाकर याने शिवीगाळ करणा-यास हटकले असता उभारीने सुधाकरला मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी कारंजा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.