
चिकणी (जामणी) : गवंडी मजुराचा पाय घसरून शेतातील विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. चिकणी शिवारात मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता ही घटना घडली. विजय पंजाब राऊत (३२, रा. देवळी) असे मृत मजुराचे नाव आहे.
देवळी येथील अनिल ओझा यांची मौजा चिकणी शिवारात तीन एकर शेती आहे. याच शेतात घराचे बांधकाम सुरू होते. बांधकामाचा कंत्राट देवळी येथील कंत्राटदार नरेश वंजारी यांना देण्यात आला होता. मंगळवारी मजुरांकडून घराच्या छपाईचे काम केले जात होते. बांधकामापासून हाकेच्या अंतरावर विहीर होती. याच विहिरीवर पिण्याचे पाणी आणायला गेलेला मजूर विजय पंजाब राऊत याचा तोल गेल्याने विहिरीत पङून मृत्यू झाला. देवळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुणणालयात पाठविण्यात आला.