वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक! एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

अल्लीपूर : वाळूची वाहतूक करणाऱ्या अज्ञात टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत. ही घटना अल्लीपूर-अलमडोह मार्गावर घडली. आकाश कोडापे रा. नागपूर असे मृताचे तर सतीश मडावी व शुंभम मसराम दोन्ही रा, वायगाव अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे. तिघेही लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वितरण करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

अपघात झाल्याचे निदर्शनास येताच अल्लीपूरचे सरपंच नितीन चंदनखेडे यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे, जमादार अजय रिठे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले, शिवाय मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here