

सेलू : घोराड ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सेलू हिंगणी मार्गावरील वार्ड क्रमांक एक मधील कुत्तरमारे लेआऊट मध्ये विद्युत खाबांवरील स्पार्कींगमुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी हा प्रकार पाहून नागरिक भयभीत झाले होते बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताचे सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत विज मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना तेथील नागरिकानी माहीती दिली असता स्थानिक लोकांना सांगा असे बोलून तत्परता न दाखविणाऱ्या या अधिकाऱ्याबाबत तेथील स्थानिक लोकांनी नाराजी व्यक्त केली. कुत्तरमारे लेआऊट मधील वॉर्ड क्रमांक एक मधील प्रमोद तळवेकर यांचे घरापासून काही अंतरावर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास खांबावर मोठी स्पार्कींग होत असल्याने जणू फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचे दिसून येत होते तिथे खाली मोकळी जागा असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही हे स्पार्कींग एवढे मोठे होते की लोक यामुळे भयभीत झाले होते कशामुळे हे झाले हे कळत नव्हते संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कता बाळगावी म्हणून याची माहिती तेथील एकाने विजवितरणचे अधिकार्यांना दिलि पण कोणतीही तत्परता न दाखवता याकडे दुर्लक्ष केल्याने अर्धा तास होऊनही तिथे कोणीही कर्मचारी आले नव्हते हे विशेष यामुळे नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे.