मशीनमधून पैसे न निघताच रक्‍कम कपात

अल्लीपूर : एटीएम मशीनमधून पैसे काढण्यास गेलेल्या युवकाचे मशीनमधून पैसे न निघताच त्याच्या खात्यातून रक्‍कम कपात झाल्याचा मेसेज आला. तब्बल १५ दिवस उलट्नही पैसे परत जमा न झाल्याने व्यक्‍ती चिंताग्रस्त झाला आहे. किशोर गावंडे हा एसबीआयच्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्यास गेला होता. त्याने पाच हजार रुपये काढण्याची प्रक्रिया केली. मात्र, पैसे निघाले नाही. पण, खात्यातून पाच हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज आहे.

किशोर गावंडे यांनी पैसे परत मिळण्यासाठी स्टेट बँकेत अर्ज केला. मात्र, अजूनही रक्‍कम खात्यात जमा झाली नसल्याने गावंडे चिंताग्रस्त आहेत. रक्‍कम मिळण्यासाठी किशोर गावंडे बॅंकेचा उंबरठा झिजवत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here