

पवनार : येथील धाम नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार (ता. २२) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. तरुण मित्रांसोबत धाम नदीपात्रावरील बांधावर पोहण्यासाठी आला होता. पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याने उडी मारल्यानंतर काही क्षणांतच तो पाण्यात बुडाला. यावेळी उपस्थित असलेल्या काही युवकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेर काढण्यात अपयश आले. काही वेळात तो पाण्यात गडांगल्या खात बुडाला. या घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली असून बुडालेल्या युवकाचा मृतदेहाचा शोध घेण्याचे काम चालू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी नदी परिसरात पोहण्यासाठी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशी मागणी केली जात आहे.