
वर्धा : कार-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास झाला. अमरावतीकडून एम. एच. १२ क्यू. एफ. ५१११ क्रमांकाची कार येत होती. तर एम. एच. २७ बी. एन. ४८०५ क्रमांकाची दुचाकी विरुद्ध दिशेने येत होती. याच दोन वाहनात जबर धडक झाली. यात मिथुन शीरशीया याचा जागीच मृत्यू झाला तर जितू धामणे व जय निंदाने हे गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अमरावती येथील रुग्णालयाकडे रवाना केले. भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.



















































