नागपूरच्या दाम्पत्याची पांढुर्ण्यात आत्महत्या! गिळले कीटकनाशक; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच

साहूर : नागपूर परडी येथील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने नजीकच्या पांढुर्णा येथे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली असून, रामकृष्णा खडतकर (६०) व शोभा खडतकर (५३) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

रामकृष्णा खडतकर व शोभा खडतकर हे २७ जुलैपासून घरून बेपत्ता होते. त्याबाबतची तक्रार नागपूर जिल्ह्यातील पारडी पोलीस ठाण्यात रामकृष्णाच्या मुलाने ३० जुलैला नोंदविली होती. एमएच ४९ एटी ५७८६ क्रमांकाचा मालवाहू ट्रक आणि रामकृष्ण तसेच शोभा यांचा शोध घेतला जात असताना शनिवारी दुपारी पांढुर्णा येथील प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी शोभा व रामकृष्णाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

माहिती मिळताच आष्टी पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. बारकाईने पाहणी केली असता मृतदेहांजवळ दोन ग्लास, बाटली. पिशवी, आदी साहित्य पोलिसांना निदर्शनास आले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. पंचनामा केल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, शोभा व रामाकृष्णाच्या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत कळू शकले माही. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, शेख नबी, गजानन वडनेरकर, बालाजी सांगळे, अश्‍विनी वानखडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here