मुख्य कॅनॉलमध्ये आढळला व्यक्तीचा मृतदेह

रोहणा : नजीकच्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कॅनॉलमध्ये व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दिघी सायखेडा शेत शिवारातून गेलेल्या कॅनॉलमध्ये मृतदेह वाहत आल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अजय सुधाकर पाटील रा. नंदमार्केट अमरावती असे मृतकाचे नाव आहे. दिघी सायखेडा शिवारातून गेलेल्या मुख्य कालव्यात व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली असता आर्वी ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोनुने, प्रभाकर वाढवे,गोटेफोडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here