
वर्धा : काही दिवसांपूर्वी देवळी येथील चौकीदार वसंता ढोणे याची त्याच्याच साडभावाने स्वत:च्याच मुलाच्या माध्यमातून त्याच्या सहा मित्रांना सव्वा लाखाची सुपारी देत हत्या घडवून आणिली. या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून, चक्क एका महिलेने आता एका व्यक्तीला सुपारी देऊन गेम करुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
गजानन बापूराव खोंड हा त्याच्या आऊजीच्या अंत्यविधीला गेला असता महिलेने त्यास तू मयतीत पुढे पुढे कशाला करून राहिला, असे म्हणून शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यास हटकले असता महिलेने जास्त करशील तर तुझी सुपारी देऊन गेम करून टाकीन, अशी थेट धमकीच दिली, याप्रकरणी गजानन याने देवळी पोलिसांत तक्रार दिली आहे.
आधीच लागोपाठ झालेल्या दोन हत्येच्या घटनांनी जिल्हा रक्ताळला असून अगदी क्षुल्लक क्षुल्लक कारणातून वादाचे प्रकार आता पुढे येऊ लागले आहे. काहींकडून मारण्याची धमकी देण्याचे प्रकारही पुढे येत असून याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.