
वर्धा : विवाहित महिलेच्या प्रियकराने क्षुल्लक वादातून विवाहितेला मारहाण करीत जखमी केले. स्टेशनफैल परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारिका विठुल शिखरे हिचे पतीसोबत पटत नसल्याने ती विभक्त राहते. तिचे लकी महेंद्र सवाई याच्याशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याने तिने लकील स्टेशनफैल परिसरातील घर बदलायचे आहे, मुलेबाळे घरी येणार आहेत, असे सांगितले. दरम्यान, लकीने तुझ्या मुलाबाळांना घरी का येऊ देते, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत तिला जखमी केले.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सारिकाने तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार बंडिवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.