डोंगरगावजवळ अपघातात दोघांचा जागीच मृत्यू! वर्धामधील घटना

वर्धा : जाम येथुन चहा पिऊन गजानन हरिभाऊ तळवेकर (३७) रा. सुमठाणा ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर व महेंद्र रामचंद्र हरणे ( २४) रा. सुमठाणा हे दोघेजण जाम येथून आपल्या गावाला परत जात असताना डोंगरगाव फाट्यावरील १०० मीटर अंतरावर असलेल्या खांबाळा चौका जवळ रस्त्याच्या कडेवर ट्रक क्रमांक एम एच ३४ बी जी ५७०९ हा बंद अवस्थेत उभा असल्येने एम एच ३४ वाय ३३६७ या दुचाकीवरून गजानन तळवेकर व महेंद्र हरणे हे जात असताना पावसाचे पाणी येत असल्याने बंद असलेला उभा ट्रक दिसुन आला नाही व मागून त्या ट्रकला मागुन या दुचाकीची जबर धडक बसली यात दोघाचाही जागीच मुत्यू झाला.

यावेळी या घटनेची माहिती पोलीस स्टेशन समुद्रपुरचे पोलीस कर्मचारी अरविंद इंदूरकर, वैभव चरडे, रवी पुरोहित यांना या घटनेची माहिती मिळाली असता समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन या अपघाताची माहिती घेतली असता यात गजानन हरिभाऊ तळवेकर व महेंद्र रामचंद्र हरणे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या ठिकाणावर पोलीस कर्मचारी अरविंद येणुरकर, रवी पूरोहित, वैभव चरडे यांनी घटनेची पाहणी करुन घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करीता दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here