मंजुर घरकुल लाभार्थ्याना बांधकामाची परवानगी द्या! प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदार तथा मुख्याधिकाऱ्याना निवेदन

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्याना नगर पालीकेने तात्काळ बांधकाम परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजु कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष जयंत तिजारे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष सिंदी रेल्वे च्या वतीने तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधील पळसगाव रोड लगतच्या लाभार्थ्यांचे यादीत नावे असून पालिका सदर लाभार्थ्याना तुमची जागा अतिक्रमण केलेली सरकारी जागा असल्याचे कारन देत घरकुल बांधकामाकरिता परवानगी देत नसल्यामुळे या लाभार्थीना पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
वास्तविक पाहता सदर लाभार्थी हे शहरात राहत असलेल्या जागी मागील २० ते २५ वर्षापासुन निवासी असुन नियमित पालिकेच्या घर कराचा भरणा करित आहे. याच आधारावर प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सर्वानी भरले होते. विशेष म्हणजे या सर्व लाभार्थ्याना शासणाने घरकुल मंजूर केले असुन अंतीम मंजूर यादीत सर्व लाभार्थ्यांचे नाव आली आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सेलू मार्फत सिंधी रेल्वे शहरात सनद (संपत्ती कार्ड) चे वाटप करण्यात आले. काही सनद मध्ये सरकार , अतिक्रमण व गावठाण असा उल्लेख केल्यामुळे नगर पालीका वार्ड क्रमांक १७ येथील लाभार्थी यांचे नाव घरकुल यादीत आली आहे. मात्र मंजूर यादीत नाव असून सुद्धा पालिका बांधकामाकरिता परवानगी देत नसल्यामुळे सदर निवेदन देऊन यातील त्रुटी आणि अडचणी दूर करून बांधकाम परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय जर आपल्या नियमामध्ये वरील लाभार्थी बसत नोव्हते तर तेव्हाच रद्द का केले नाही. त्यांना सदर अर्ज करतांना नकाशा, पालीका कराचा भरना इतर कागद पत्रे आदी बनविण्यात झालेला खर्च आणि रोजमजुरी पाडुन खर्ची घातलेला कामाचा वेळ वाचला असता गोर-गरीब जनतेचे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास टाळता आला असता असा प्रती प्रश्न करुन पालिकेच्या ढिसाळ नियोजन आणि कारभारावर ताशरे ओढली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देते वेळेस वर्धा जिल्हाध्यक्ष जयंत तिजारे, सेलू तालुकाप्रमुख हंसराज बेलखोडे, उपप्रमुख नितेश भोमले, सिंदी शहर प्रमुख सुरज आष्टनकर, उपप्रमुख सचिन पेटकर, गणेश बावणे, बजरंग उईके, सुनिल सोनटक्के, बालू गाते, बाबा बावणे, दिलीप बावणे,अर्जून पोहीनकर ,सतीश दाते आदी तसेच वार्ड क्रमांक १७ येथील लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here