पालकत्व हरवलेल्या कुटूंबीयांचे सात्वन! माजी आमदार अमर काळे यांनी घेतली कुटूंबीयांची भेट

खरांगणा मोरांगणा : येथून जवळच असलेल्या दहेगाव गोंडी येथील चौधरी कुटूंबावर काळाने गुरुवार (ता. ९) झडप घातली आणि दोन चिमुकल्यांचे आधारस्तंभ हिरावून घेतले. या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याकरीता व आर्थिक मदत देण्याकरीता आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली.

संततधार पावसामुळे झोपेत असलेल्या कुटूंबीयांवर घराची भिंत पडल्याने पत्नी ही जागीच मरण पावली तर पतीचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला होता तर मोठा मुलगा आदित्य वय 14 वर्ष हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलांवर मोठे संकट कोसळले दोन्ही मुले पोरकी झाली त्यांच्या उदरनीर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

याबाबतची माहिती प्रसिद्धी माध्यमातून व कार्यकर्त्याकडून मिळाल्याने माजी आमदार अमर काळे यांनी या कुटूंबाला भेट देऊन मृतक रामकृष्ण चौधरी यांचे वयोवृद्ध वडील आणि आई यांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत दिली यावेळी गावच्या सरपंच प्रीती श्रीराम, रमेश्राव गोडे, उत्तमराव हेले, मनोज साहू, विनायकराव कौरती, किशोर बड्डे, गौरव गोडे यांच्यासह गावातील कार्यकर्ते हजर होते.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here