
आर्वी : तुझ्या नातवाने आमचा मोबाईल हरविला आहे, एकतर पैसे द्या नाही तर मोबाईल द्या, या कारणातून वाद करीत तिघांनी माय-लेकास मारहाण करीत जखमी केले. दत्तवॉर्ड येथे ही घटना घडली. छबू बापूराव क्षीरसागर ही घरी असताना हंसी जैस्वाल, नंदनी जैस्वाल, मुहु जैस्वाल हे घरासमोर आले. त्यांनी तुझा नातू यश याने मोबाईल हरविला आहे, आम्हाला मोबाईलचे पैसे द्या, नाही तर तुमच्या घरी येऊन आत्महत्या करतो, असे म्हणून धमकी दिली.
काही वेळाने त्यांनी मुलासह सुनेला शिवीगाळ करून गुडुने मुलगा राजेश याला मारहाण केली. त्यांच्या भीतीने ३ हजार रुपये मोबाईलचे दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिघांनी वाद करीत शिवीगाळ केली. तसेच राजेशसह छबूबाई हिला मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

















































