कामगाराचा चिरला नायलॉन मांजाने गळा! जखमी कामगार रुग्णालयात दाखल

तळेगाव : नायलॉन मांजा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो, असे सांगितले जात असले, तरी पतंग उडविणारे याच मांजाचा वापर करतात. याच पार्श्वभूमीवर तळेगाव येथील सिडेट कंपनीत कामगार म्हणून रुजू असलेल्या संदीप परोपटे हा घरी परत जात असताना, नायलॉन मांजाने त्याचा गळा चिरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जखमी संदीप याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर-अमरावती महामार्गावरील सिडेट या कंपनीत संदीप काम करतो. कर्तव्य बजावून तो सायंकाळी दुचाकीने घरी परत जात होता. अशातच नागपूर-अमरावती महामार्गाच्या शेजारी दोन मुले पतंग उडवत होती. याच पतंगीचा मांजा संदीपच्या गळ्याला अडकत त्याचा गळा चिरल्या गेला. या घटनेत संदीप याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्याला सुरुवातीला तळेगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले, पण जखम गंभीर स्वरूपाची असल्याने त्याला तातडीने आर्वी उपजिल्हा रुणालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here