
आर्वी : जात प्रमाणपत्रासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांचा पालकांना अनेकदा शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. अनेक पालकांना साधा आवेदन अर्जही भरता येत नाही. अशात काही चुका होतात. परिणामी भविष्यात विद्यार्थ्याला नाहक त्रास सहन करावा लागतो. पण आता सहाय्यक आयुक्त समाजकल्याण वर्धा यांच्या पत्रानुसार शिक्षण अधिकारी वर्धा यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना जात प्रमाणपत्र शालेय स्तरावर उपलब्धतेबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची पायपीट थांबणार आहे.