तंटामुक्त गावातील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात! समाजहितासाठी राबवली होती मोहीम

वर्धा : गावागावात छोट्या-मोठ्या वादानंतर उद्भवणारे तंटे गाव पातळीवरच मिटविण्यासाठी राज्यभर राबविलेली तंटामुक्ती मोहीम थंड पडल्याचे चित्र आहे. या समित्या आता कागदोपत्रीच शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे गावात मिटणारे तंटे आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावरही कामाचा ताण वाढत आहे,

तत्कालीन गृहराज्यमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून तंटामुक्ती अभियान राज्यभर सुरू केले होते. गावातील छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्यात जाण्याअगोदरच गावातच मिटावे, तसेच गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम राहावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी ग्रामपातळीवर तंटामुक्त समित्या गठित करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर या मोहिमेला गावागावातून चांगला प्रतिसाद येत गेला. गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण कमी होऊन जातीय सलोखा राखला जाऊ लागला, एवढेच नव्हे, तर परिसरातील गावागावांमध्ये तंटामुक्त गाव होण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यातून अनेक गावांना या कामगिरीतून लाखो रुपयांची पारितोषिके दिली आहेत. मात्र, सध्या हे अभियान थंडबस्त्यात दिसून येत आहे. सरकार बदलल्यानंतर इतर योजना अश्या थंडबस्त्यात जातात, त्याप्रमाणेचतंटामुक्त योजनेची अवस्था झाल्याचे दिसून येते.

समित्या नावालाच

पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून काहीच कारवार्ड होत नसल्याने समाजहितासाठी राबविलेली ही मोहीम सध्या कागदावरच असल्याचे वास्तव आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील गावांचे प्रशासनाकडून मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळ मोहिमेत कार्वरत असलेल्या तंटामुक्त सपित्यांकडूनही काम होताना दिसत नाही. आता गावपातळीवरील रस्ता अडविणे, जपिनीचे वाद, बांधावरून होणारी भांडणे, आडे तोडणे आदी कारणांवरून वाद होऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here