आर्वीतील दुचाकी चोरट्यांचे मोर्शी-शिरखेड कनेक्शन! पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

आर्वी : येथील दोन दुचाकी चोरट्यांचे थेट मोर्शी-शिरखेड येथील दुचाकी चोरांशी कनेक्शन असून तिघांनी तब्बल शहरातून ११ दुचाकी लंपास केल्याची माहिती आहे. शरखेड पोलिसांनी आर्वी येथील पोलीस विभागाच्या मदतीने आर्वीतील दोन दुचाकी चोरट्यास अटक करून त्यांच्याकडून ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली. शुभम कदम, शुभम लोखंडे रा. आर्वी असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिरखेड पोलीस ठाण्यात अक्षय गंगाधर दवंडे रा. वरुड यांची दुचाकी वीटभट्टी परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांच्या पथकाने याची चौकशी केली असता निंभी येथील प्रतीक गायकी याच्या घरी एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी पोलिसांना आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने प्रतीकला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आर्वी येथील शुभम कदम व शुभम लोखंडे यांच्या मदतीने विविध ठिकाणांवरून ११ दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली.

या चोरलेल्या दुचाकी खरेदी करणाऱ्याची नावेही सांगितली. त्या आधारावर पोलिसांनी इंदापूर येथील मंगेश गायकी, लाडकी येथून अर्पण पाठरे, बोडणा येथील प्रफुल्ल बहुरूपी तसेच गिट्टीखदान मोर्शी येथून सय्यद इक्बाल सय्यद कादर, पाळा येथून नीलेश वाघडर, मोर्शी रवींद्र कडू आणि निभी येथील भूषण राजूरकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here