2 पिस्टलसह 1 जिवंत काडतूस जप्त! आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वर्धा : शहरातील स्टेशनफैल परिसरात दोन गुंडांच्या टोळीत मोठा राडा होत फायरिंग झाली होती. या घटनेतील सर्वच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत अटक केली होती. मात्र, पांडे गटातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रितीक तोडसाम हा फरार होता. अखेर १९ रोजी फरार आरोपी रितीक तोडसाम याला स्थानिक गुन्हे शाखेने इतवारा परिसरातून अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल आणि एका जिवंत काडतूसही जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी स्टेशनफैल परिसरात दोन संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आमने-सामने येत सशस्त्र हाणामारी झाली होती. दरम्यान, एका गुन्हेगाराने हवेत गोळीबार केला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील सर्व अकराही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मात्र, रितीक गणेश तोडसाम रा. इतवारा बाजार हा घटना घडल्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होता. अखेर १९ रोजी रितीक तोडसाम हा त्याच्या काही मित्रांसह गुन्हा करण्याच्या उद्देशाने इतवारा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार रितीक तोडसाम याला मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक आर.बी. खोत, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे, पवन पन्नासे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here