शिवीगाळ करून महिलेस मारहाण! पोलिसात गुन्हा दाखल

वर्धा : मी तुला आठ दिवस अगोदर चिठी पाठविली त्यावर तू काहीच नाही असे म्हणून महिलेचा हात पकडून तिला मारहाण केली. त्यानंतर दोन ते चार जणांनी संगणमत करून महिलेच्या घरात येऊन शिविगाळ करून पती व सास-याला मारण्याची धमकी दिली. ही घटना 29 डिसेंबर रोजी सांयकाळी 7 वाजता मौजा वायगाव येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सूरज मारोती कडे, मारोती कडे, मुक्ताबाई कडे, धीरज मारोती कडे सर्व रा. वायगाव निपाणी या चार जणांविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here