रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्याची दुरावस्था! कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे जनता त्रस्त

सिंदी (रेल्वे) : चार वर्षापासून पासुन सुरु असलेल्या येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम आज ४४ महीणे लोटुन सुध्दा पुर्ण झाले नसुन कामामुळे रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. करीता पुला लगत पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिला आहे मात्र या पर्यायी रस्त्याकडे रेल्वे कंत्राटदारांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शहरातील सामान्य नागरीकांना या पावसाळ्याच्या दिवसात नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. त्यामुळे “रेल्वे उड्डाणपुल बणायचा तेव्हा बनेल मात्र अगोदर पर्यायी रस्ता तरी व्यवस्थित बनावा असे नागरीक बोलू लागले आहेत.

कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे या पर्यायी रस्त्यावर ठीक-ठीकानी मोठे खड्डे पडले असुन रस्ता अरुंद असल्याने एकच वाहन येथून कसेबसे जाऊ शकते. लाईटची पुर्ण व्यवस्था नसल्याने रात्री च्या अंधारात वाट चाचपडत मार्ग काढावा लागतो. शिवाय आता पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचुन अशरक्षः तलाव तयार झाला आहे. खड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहन चालकाची येथे दररोज फजिती होते.

याबाबत अनेक वाहन चालक आणि येथुन नेहमी जाने-येने करणार्‍यांनी कंत्राटदाराकडे तोंडी तक्रारी केल्या मात्र मुजवर कंत्राटदाराने याकडे मुळीच लक्ष दिले नाही. या त्रासामुळे अपघात व्होवून एखाद्याचा जीव जाण्याची वाट तर पाहत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडत आहे.

“भीक दे अथवा नको देऊ मात्र अगोदर कुत्र आवर” अशी म्हणण्यांची वेळ सिंदीवासीयांवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here