घरामध्ये सुतळी बॉम्बचा स्फोट! इसमाचा तुटला कान; स्टेशनफैल येथील घटना

वर्धा : झोपून असलेल्या 56 वर्षीय व्यक्‍तीच्या घरात कोणीतरी व्यक्‍तीने सुतळी बॉम्ब टाकून स्फोट झाला. त्यात झोपून असलेल्या व्यक्तीचा कानच तुटून पडला. ही घटना शहरातील स्टेशनफैल येथे घडली.

ऐफाज युसुफ खान (26) रा. स्टेशनफैल यांचे 56 वर्षीय वडिल हे घरी एकटेच झोपून होते. 29 ऑक्टोंबर रोजी झोपून असताना 1.30 वाजता सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्‍तीने घरात सुतळी बॉम्ब टाकला. त्यात तो बास्ट झाल्याने वडिलांचा कान तुटून जखम झाली. मुलाने घरी जावून पाहिले असता घराचे हॉलमध्ये पांधरून घेण्याचे ब्लँकेट अर्धवट जळालेले होते. ब्लॅकेटमध्ये व जवळ सुतळी बॉम्बचे फटाक्याचे तुकडे व बारुद सारखे राख दिसत होती. युसुफ खान रहिमखान पठाण हे घराचे दार उघडे करुन झोपलेले होते. स्फोट झाल्यामुळे परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. मझहर खान याने जखमी व्यक्‍तीला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असून त्याचा उपचार सुरु आहे. याप्रकरणी ऐफाज खान याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here