व्यापार्‍याकडून शेतकर्‍याला 1.69 लाखांचा गंडा! चणा खरेदीचे पैसे दिलेच नाही; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

वर्धा : एका खासगी व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचा चणा खरेदी करून घेतला. मात्र, शेतमालाचा मोबादला रब्बी हंगाम आला तरीही मिळाला नसल्याने शेतकऱ्याने थेट पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली. या शेतकऱ्याची तब्बल 1 लाख 69 हजारांनी फसवणूक झाली आहे.

वर्धा तालुक्यातील दहेगाव (गावंडे) येथील शेतकरी विजय देवराव गावंडे यांनी रब्बी हंगामात चण्याची लागवड केली होती. त्यांना चांगल्यापैकी चण्याचे उत्पादन झाले होते. मागील वर्षी बाजारपेठेत चण्याला 4 हजार 650 रुपये प्रती क्विंटल भाव होता. त्यामुळे त्यांनी 5 जून 2022 रोजी राहत्या घरून खासगी व्यापारी कैलास काकडे रा. प्लॉट नं. 43, वॉर्ड नं. 2 ,श्रोनगर ले-आऊट, यशवंत कॉलनी, वर्धा याच्याकडे 30 क्विंटल 83 किलो आणि ठेक्याच्या शेतीतील 33 क्विंटल 10 किलो चणा विकला. या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचा शेतमाला 5 हजार 550 रुपये दराने खरेदी केला. यावेळी खासगी व्यापारी कैलास काकडे याने शेतकरी गावंडे यांना 50 हजार रुपये रोख दिले होते. उर्वरित पैशाचा चेक तुम्हाला देतो म्हणून शेतमाल घेऊन गेला. त्यानंतर शेतकरी व्यापाऱ्याकडे गेले असता व्यापारी काकडे याने शेतकऱयाचा मुलगा समीर याच्या नावावर एक लाखाचा चेक दिला. तर वडिलांच्या नावे 69 हजारांचा चेक दिला. तर ठेक्याने ज्यांची शेती केली त्या राजेंद्र भुरे यांच्या नावावर 71 हजारांचा चेक दिला होता.

काही दिवसानंतर तुम्ही बँकेत टाका, असे सांगून वेळ मारून नेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी बँकेत चेक टाकला. बुरे यांच्या बँक अकाऊंटमध्ये 71 जमा झाले. मात्र, समीर आणि त्याचे वडील विजय गावंडे यांचा चेक बान्स झाला. त्यामुळे शेतकऱ्याने व्यापाऱ्याला विचारणा केली असता दुसरा चेक देतो, असे म्हटले. त्यानंतर 8 ऑगष्ट 2020 रोजी व्यापाऱ्याने पुन्हा दुसर्‍या बँकेचे चेक दिला. तोही वठला नाही. त्यानंतर शेतकऱ्याने व्यापाऱ्याला फोन करून व घरी जाऊन पैशाची मागणी केली. मात्र, आजपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने वर्धा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here