विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल

भाजपा, राष्ट्रवादीने दिले डमी उमेदवार

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीशीही चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत भाजपाने ४, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २ तर काँग्रेसने १ उमेदवारी जाहीर केला आहे. ९ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. काँग्रेसने दुसऱ्या जागेचा अट्टाहास सोडल्यानंतर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
आज विधान भवनात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाय यासोबत भाजपाने रमेश कराड आणि संदीप लेले असे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने किरण पावस्कर यांची डमी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखली केली असून एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. छाननीनंतर रमेश कराड, संदीप लेले व किरण पावस्कर उमेदवारी अर्ज मागे घेतील त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here