लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमण! गणनायक विराजमाण झाल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण

– राहुल काशीकर
————

वर्धा : प्रथम तुला वंदीतो गणराया, या जयघोषात आज शनिवारी गणरायाचे घरोघरी आगमण झाले आहे. सर्वत्र कोरोनाचा कहर असल्याने गणराया भक्तांच्या भेटीसाठी येणार की, नाही असा प्रश्न सर्व भक्तांना पडला होता. मात्र यावर्षी सुध्दा घरोघरी शनिवारी गणरायाचे आगमण झाले आहे. प्रशासनाच्या नियम व अटी प्रमाणे घरोघरी गणरायाचे आगमण झाले आहे. सर्वत्र भक्तामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज शनिवारी गणरायाची भक्तांच्या घरी स्थापना झाली आहे, या दिवसाची भक्तांना वर्षभर प्रतिक्षा करावी लागते. हिंदु धर्मामध्ये गणेशोत्सवाला फार महत्व आहे. गणराया हे भक्तांच्या भेटीसाठी दहा दिवस येतात मात्र त्या दहा दिवसात भक्ता मध्ये आनंदाचे वातावरण राहतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी गणेश मूर्तींना वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली नाही. प्रशासनाच्या दिलेल्या नियम अटी नुसार यावर्षी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

कोरोना मुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना प्रत्येकच क्षेत्रावर पडल्याचे दिसून येत आहे. यापासून धर्म आणि श्रद्धा हेही सुटलेले नाहित. महाराष्ट्रातील गणेशोत्सव देशात प्रसिध्द आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीनेच भक्तांना गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. उत्सव कसे साजरे करावे याकरिता शासनाने परिपत्रकच काढले आहे. असे असले तरी बाप्पाच्या आगमणाने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here