कायबी करा न कसबी करा’ पण घरकुल बांधकाम पुर्ण करा! आदेशाने लाभधारकांची फजीती

वर्धा : जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे शासकीय योजनेतून मिळणाऱ्या घराच्या बांधकामासाठी रेती मिळेनासी झाली आहे. रेती तस्करांकडून बाजारात येणाऱ्या वाळूची किंमत सर्वसाधारण लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र शासनानाच्या ‘कायबी करा न कसबी करा’ पण घरकुल बांधकाम पुर्ण करा अशा तुघलकी आदेशाने सर्वसामान्यांनी धस्का घेतलेला आहे. या आदेशामुळे मंजूर घरकुलधारकांनी रेती कुठून आनायची आणि घरकुल कसे उभे करायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. रेती मिळत नसल्याने अनेकांच्या घरकुलांचे स्वप्न अर्धवटच

पंतप्रधान घरकुल आणि इतर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुल योजनेला सध्या रेतीचे ग्रहण लागले आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे रेती माफीयांकडून तस्करी जोरात सुरू आहे. तीप्पट भाव वाढवील्याचे दिसुन येत आहे.
रेती तस्करांकडून विकल्या जाणार्या रेतीची किंमत सर्वसाधारण लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे घरबांधकामाचे अंदाजपत्रक आणि रेतीच्या किंमती याचा ताळमेळ जुळत नाही. परिणामी अनेकांनी बांधकामाला सुरवात केली नाही. ज्यांनी केली, त्यांचे बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या घरकुल बांधकामाची रक्कम परत जाण्याची भीती लाभार्थ्यांना आता सतावत आहे.

बांधकाम मजुरांचे वाढलेले दर, सिमेंट, लोखंड आणि इतर साहित्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होत नाही. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधीसोबत अनेकांनी कर्ज घेतले आहे. परंतु घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही, तरीही त्यांना आता कर्जाचे हप्ते फेडावे लागत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनीधीनी यावर लक्ष देत हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आता जोर धरु लागलेली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाकडून नोटीस

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मंजुर घरकुलधारकांना नोटीस बजावलेली आहे. यात तात्काळ बांधकामास सुरवात करावी अन्यथा आपणास या योजनेच्या लाभाची गरज नसल्याचे समजून आपले मंजूर घरकुन रद्द करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य घरकुल धारकांनी आता काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

धास्तावलेल्या लाभार्थ्यांचे बीघडले बजेट

अतिषय गरीब कुटूंबातील गरजू लोकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातुन घरकुल मंजूर होतात त्यात शासनाच्या मततीतुन आणि काही पैसे आपल्या जमापुंजीतुन लाभधारक खर्च करुन आपले घर उभे करतात मात्र रेतीघाट बंद असताना शासनाने पक्के घर बांधकाम तात्काळ चालू करण्याच्या या आदेशाने अनेकांनी बांधकाम चालु केले मात्र चोरीची रेती तीन पट जास्त दराने घ्यावी लागल्याने त्यांचे बजेट बिघडले आणि अनेकांचे स्वप्न अर्धवट राहीले.

गावातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम चालू करण्याबाबत नोटीस पाठविले होते. अनेकांनी बांधकामास सुरवातही केली आहे. काही लोकांचे बांधकाम रेती अभावी थांबलेले असल्याचे आढळून आले आहे.

शालीनी आदमने, सरपंच ग्रामपंचायत पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here