विवाहितेचा विनयभंग करीत पतीस मारहाण

वर्धा : विवाहितेचा विनयभंग करीत पतीसह सासूला मारहाण करण्यात आली. न्यू रेल्वे कॉलनी सिंदी मेघे परिसरात ही घटना घडली. विवाहिता घरी असताना सतीश शर्मा रा. साबळे प्लॉट हा तिच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आला आणि पती पप्पू डांगट कहा गया उसको मारणे का है असे म्हणू लागला. विवाहितेने पती झोपून असल्याचे सांगितले असता संतीशने विवाहितेला अश्लील शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला.

दरम्यान विवाहितेची सासू वाद सोडविण्यास धावली. पप्पू डांगट हा मध्यस्थी गेला असता त्यालाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीहून रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असून पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली जात आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here