

वर्धा : सेवाग्राम येथील आदर्शनगर हुतात्मा स्मारकाच्या मागे युवकाचा मृतदेह आढळला. अमोल कुमरे (वय २४) रा. वरूड असे मृताचे नाव आहे. अमोल कुमरे याला दारूचे व्यसन होते. तो घरी एकटाच राहत होता. ३० जानेवारीला तो घरून निघून गेला. दरम्यान, त्याचा मृतदेह नळाच्या खड्ड्यात पडून आढळला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.