कोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरु करा! पालकमंत्री सुनील केदार

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून तयार असून केवळ किरकोळ बाबीमुळे सदर इमारत अद्याप वापरात यायची आहे. या केंद्रासाठी तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊन हे केंद्र तातडीने रुग्णांच्या सेवेत दाखल करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरा येथील महसूल मंडळ कार्यालयाचे उद्घाटन झाले यावेळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटन आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने अद्यापही रुग्ण सेवेत दाखल न झाल्याची तक्रार गावक-यांनी केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी कोरा येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. सदर इमारतीचे उद्घाटन जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु या कारणास्तव केंद्र बंद राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गावातील आरोग्य केंद्राची जुनी इमारत वापरणे योग्य नाही त्यामुळे नविन इमारत तातडीने सुरु होणे आवश्यक आहे. या केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सुध्दा यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी संबंधितास दिले. यावेळी माजी आमदार राजु तिमांडे, मनोज चांदुरकर, तहसिलदार राजु रणविर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून चरखा सभागृहाची पाणी पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर सेवाग्राम रोडवर नव्याने बांधण्यात आलेल्या चरखा सभागृहाची पाहणी केली. यावेळी माजी आमदार राजु तिमांडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, उपविभागीय अभियंता श्री. माथुलकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here