वर्धा : क्षुल्लक कारणातून वाद करीत युवकाच्या डोक्यावर मारहाण करीत त्यास जखमी केले. आंबोडा लुंगे येथे ही घटना २६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभय भास्कर गायकवाड हा त्याच्या मालकीच्या शेतात उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना किशोर शंकर गायकवाड याने त्याला रस्त्यात अडविले. शिवाय तू काल सुरक्षा रक्षकासोबत वाद का केला होता, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच डब्याने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले.
याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीमुळे गावात चांगलीच खळबळ उडली असून जखमीला रुणालयात दाखल करण्यात आले आहे.