

रोहणा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एक युवक जखमी झाला. वाई फाट्याजवळ हा अपघात झाला.
एम. एच. २७ सी. एल. ६५७४६ क्रमांकाची दुचाकी मंगरूळकडून पुलगावकडे जात होती. तर एम. एच. ३२ डब्लू. ६४१४ क्रमांकाची दुचाकी मारडा येथून रोहण्याकडे जात होती. दरम्यान वेगात असलेल्या दोन्ही दुचाकी वळण रस्त्यावर समोरसमोर धडकल्या यात. मंगरुळ येथील रहीवासी सूरज नामक युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती आह. त्याला पुलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस मित्र उमेश उजवणे यांनी जखमीला रोहणा येथील आरोग्य केंद्रात नेत प्रथमोपचार करीत पोलिसांना याची माहिती दिली.